Ad will apear here
Next
पुण्यातील क्रिकेटचे संग्रहालय गुगलच्या व्यासपीठावर; घरबसल्या पाहता येणार
‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’ संग्रहालयाला आर्टस् अँड कल्चर प्रकल्पात स्थान


पुणे :
सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या सामन्यांमध्ये भारताचे क्रिकेटपटू कशी चमक दाखवणार आणि प्रतिस्पर्ध्यांना नमवून चषक आपल्याकडे खेचून आणणार का, याची उत्कंठा शिगेला पोहोचली असतानाच क्रिकेटवेड्या भारतीयांना अभिमान वाटेल अशी एक गोष्ट घडली आहे. जगभरातील क्रिकेटचा समृद्ध वारसा जतन करणाऱ्या ‘ब्लेड्स ऑफ  ग्लोरी’ या पुण्यातील क्रिकेट संग्रहालयाने गुगलच्या ‘आर्टस् अँड कल्चर’ या विशेष ‘ऑनलाइन प्लॅटफॉर्म’वर स्थान मिळवले आहे. त्यामुळे जगभरातील क्रिकेटप्रेमींना हे संग्रहालय थ्री-डी स्वरूपात स्वरूपात घरबसल्या पाहता येणार आहे. 


https://goo.gle/2KrC9sC या लिंकवर जाऊन आपण जणू या संग्रहालयातच उपस्थित आहोत, असा आगळावेगळा अनुभव क्रिकेटप्रेमींना घेता येणार आहे.    

स्वतः उत्तम क्रिकेटपटू असलेले क्रिकेटप्रेमी रोहन पाटे यांनी २०१२ मध्ये पुण्यात सहकारनगरमधील स्वानंद सोसायटी येथे चार हजार चौरस फुटांच्या भव्य जागेत हे क्रिकेट संग्रहालय साकारले आहे. जागतिक क्रिकेटमधील संस्मरणीय सामने आणि मैदान गाजवलेल्या क्रिकेटपटूंनी वापरलेल्या वस्तूंचा दुर्मीळ खजिना या संग्रहालयात आहे. या संग्रहालयाचे उद्घाटन मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते करण्यात आले होते.

रोहन पाटे म्हणाले, ‘या संग्रहालयाचा गुगलच्या आर्टस् अँड कल्चर प्लॅटफॉर्मवर समावेश झाल्यामुळे पुण्याचे नाव पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर आले आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी ही आनंदाची बाब असून, प्रत्येक जण आता घरबसल्या हा संग्रह पाहण्याचा आनंद घेऊ शकेल.’

सचिन तेंडुलकरने वापरलेल्या वस्तूंचा एक खास विभागच या संग्रहालयात आहे. तसेच भारताच्या क्रिकेट संघाचा कप्तान विराट कोहली याच्या नावाचाही खास कक्ष संग्रहालयात असून, त्याचे उद्घाटन विराटच्याच हस्ते करण्यात आले होते. विव्हियन रिचर्ड्स, वसीम अक्रम, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, ख्रिस गेलपासून केदार जाधवपर्यंत विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी या संग्रहालयास भेट दिली आहे.



हेही जरूर वाचा..
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZMMCB
Similar Posts
‘महिला खेळाडूंची कामगिरी प्रेरणादायी’ पुणे : ‘आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया अग्रेसर आहेत. क्रीडा क्षेत्रातही त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. अशा महिला खेळाडूंची कामगिरी इतर महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी असते,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.
अझर गोट्या इलेव्हन संघाने जिंकला स्वच्छता करंडक पुणे : पुणेकरांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने माय अर्थ फांउडेशन आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अझर गोट्या इलेव्हन या क्रिकेट संघाने हा ‘स्वच्छता करंडक’ जिंकला.
क्रिकेट सामन्यात दृष्टिहीन महिलांचा डोळस महिलांवर विजय पुणे : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील पिंपरी-चिंचवडमध्ये दृष्टिहीन महिला विरुद्ध डोळस महिला असा क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे या सामन्यात दृष्टिहीन महिलांनी डोळस महिलांवर दहा धावांनी विजय मिळवला.
‘कॅफे’च्या माहौलला ‘क्रिकेट’चा तडका; पुण्यातील तरुणाने सुरू केला ‘क्रिककॅफे’ पुणे : सध्या सुरू असलेली क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा आणि त्यात भारताने पाकिस्तानवर मिळवलेला विजय यामुळे देशभरात मान्सूनसह क्रिकेटचेही वारे जोरात वाहत आहेत. क्रिकेट हा जणू धर्मच असलेल्या भारतात या खेळाचे चाहतेही तितकेच ‘क्रेझी’ आहेत आणि या सर्वांपेक्षा वेगळा नसेल तो पुणेकर कसला! तुषार जाधव या पुणेकर युवकाने

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language